चला,...चला,,,राणीचे बांबरुड (पाचोरा) येथे येणाऱ्या दुर्गा उत्सव निमित्ताने माजी आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाऊंडेशन मार्फत दिनांक 5/10/2024 रोजी कुस्त्यांची भव्य दंगल,,, पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी पैलवानांना येण्याचे आवाहन व निमंत्रण*
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी) बांबरुड राणीचे येथे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन यांच्यामार्फत "दुर्गादेवी उत्सवा" निमित्ताने भव्य कुस्त्यांचे दंगल.... दिनांक 5/9/2024 रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळी ठरविले आहे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व पि.टी.सी. चेअरमन नानासो. संजयजी वाघ यांच्या उपस्थितीत ही कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे कि,ह्या नवरात्रात पाचो-या तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे कित्येक वर्षानंतर कुस्त्यांचे आयोजन होत आहे, म्हणून राणीचे बांबरुड च्य सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच गावातील कुस्तीपटू मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे तसेच पाचो-यातालुक्यातील, पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी, पैलवानांना ही आव्हाना सह विनंती करुन येण्याचे आमंत्रित करत आहे की तुम्ही पण येऊन कुस्त्या खेळाव्या अशी आव्हान माजी आमदार दिलीप भाऊ युवा फाऊंडेशन मार्फत करत कुस्त्यांची भव्य दंगल जागेचे ठिकाण दूध डेअरी च्या पाठीमागे बांबरुड राणीचे(पाचोरा) येथे आयोजित करण्यात आले आहे ज्यांना कुस्ती मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी गावातील संपर्क म्हणून बापू देवरे व गुलाब तडवी यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा व कुस्त्यांमध्ये सहभागी व्हावे तसेच बांबरुड राणीचे येथून पंचायत समिती सदस्य ललित वाघ व पाचोरा येथून भूषण वाघ यांचे सहकार्य लाभणार आहे गावातील ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ यांनी आव्हानासह येण्याची आपणास आमंत्रित केले आहे.
Comments
Post a Comment