25 सप्टेंबर 2024 बुधवारी हाॅटेल सिल्व्हर पॅलेस जळगाव येथे जागतिक फार्मासिस्ट डे साजरा ..
(पाचोरा प्रतिनिधी नाना सोनवणे)
25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट डे साजरा ..
दिनांक 25 सप्टेंबर रोजी सिल्वर पॅलेस हॉटेल जळगाव येथे महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशन जळगाव यांनी
ग्लोबल मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स.
हे ब्रीदवाक्य घेऊन शासकीय सेवेतील औषध निर्माण अधिकारी यांच्या जिल्हा संघटनेने जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला.
सभेचे अध्यक्षस्थानी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी श्री सचिन भायेकर सर होते. सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन केले. त्यानंतर संघटनेचे दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा. दादासो श्री उमेश महाजन यांनी प्रस्तावना केली. सर्व औषध निर्माण अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. जागतिक फार्मासिस्ट डे, फार्मासिस्ट जागतिक गरजा पूर्ण करणारे फार्मासिस्ट एकाकी पदामुळे कामाच्या ओझ्यामुळे ताणतणावात जगत आहे. एकाकी पद असल्यामुळे वाढत्या कामाच्या आलेखामुळे त्रस्त आहेत. कामकाजाचे कोणतेच उद्दिष्ट नसताना प्रत्येक फार्मासिस्ट अगदी प्रामाणिकपणे कार्य करीत आहे. जेवढे रुग्ण सरकारी दवाखान्यात येतात त्या रुग्णांसाठी एकच फार्मासिस्ट असतो. आम्ही समाजाचे काही देणे लागतो या उक्तीप्रमाणे रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देतो. औषधांचा योग्य डोस देणे व त्याचा फॉलोअप घेणे राहणे . रुग्ण कसा बरा होईल एवढ एकच ध्येय मनात असते. कधी कधी रुग्ण घेण्याच्या चांगल्या मनस्थितीत नसतात, त्यांचा रोष पत्करून त्यांना योग्य तो सल्ला देणे त्यांचे आरोग्याची काळजी घेणे, प्रत्येक फार्मासिस्ट हा प्रामाणिकपणे कार्य पार पाडत असतो. मग फार्मसीसच्या गैरहजरीत म्हणजे रिक्त पदे, रजा, मीटिंग, ट्रेनिंग, जिल्हा लेव्हलवरून मेडिसिन आणणे अशा वेळेस अनेक प्रश्न तयार होतात, प्रशासन अशा गैरहजेसच्या वेळेस काही नियमावली तयार करणार आहे का? खरंतर दोन पदाची गरज असताना कोणत्याही प्रकारचा निर्णय होताना दिसत नाही आहे. उपकेंद्रां सुद्धा फार्मासिस्टची गरज आहे. जिथे डॉक्टर तिथे फार्मासिस्ट आवश्यक आहे. फार्मासिस्ट हा जागतिक आरोग्य सेवेमधला महत्त्वाचा दुवा आहे. शासकीय सेवेत डिप्लोमा डिग्री मास्टर डिग्री यांच्यासाठी एकच पद नोकरी साठी उपलब्ध आहे. सर्वांना वेतनश्रेणी एकच हा खूप मोठा अन्याय आहे. वेतन त्रुटी साठी व इतर मागण्यांसाठी शासन दुर्लक्ष करीत आहे .केंद्र सरकारने राज्य सरकारला स्वतंत्र औषधी संचालय सुरू करावे असे परिपत्रक दिले तरीही अजून कुठलीही कारवाई नाही केंद्र सरकारने फार्मसी ॲक्ट सर्व राज्यांनी लागू करावा असे अधिसूचना देऊनही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलही याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. एका बाजूला नविन फार्मसी कॉलेज मान्यता देत आहे त्याप्रमाणे शासनाकडे नोकऱ्या उपलब्ध नाहीत. याकडे जिल्हा अधिकारी यांनी शासन दरबारी प्रश्न मांडावेत या विनंतीसह प्रस्तावना प्रस्तावित केली. सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे यांचे आसू आणि हसू व आरोग्य तसेच श्री रविंद्र पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे संघटन या विषयावर मुद्देसूद खुसखुशीत,व्याख्याने झालीत . यावेळी प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते श्री दादासो. उमेश महाजन यांचा माजी राज्य सचिव दशरथ वाणी साहेब यांनी राज्यस्तरीय सन्मानचिन्ह माननीय श्री जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर सरजी यांच्या हस्ते गुणगौरव करून एक सन्मानचिन्ह प्रदान केले.जिल्ह्यातील उपस्थितीत सेवानिवृत्त मुख्य फार्मसी ऑफिसर, संघटनेचे पदाधिकारी, नवनियुक्त फार्मसी ऑफिसर, व मरणोत्तर फार्मसी ऑफिसर यांचा फॅमिली चा गुण गौरव, सत्कार करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर माननीय श्री सचिन भाये कर यांच्या अध्यक्षीय भाषणात आरोग्य क्षेत्रामध्ये औषधे योग्य वापर करणे अति आवश्यक आहे. अतिवापर हा आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. औषध निर्माण अधिकारी यांच्या संबंधित प्रश्न शासन स्तरावर पत्रव्यवहार करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रत्येक औषध निर्माण अधिकाराना काही सूचना दिल्या आपण आपल्या कडे गोरगरीब लोकांना योग्य ते औषध देऊन लोकांना चांगलली सेवा द्यावी. प्रत्येकाने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या नावाचे एक स्वतःचे झाड लावावे व त्याची निगा राखावी असे सांगून जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या . आभार प्रदर्शन विजय बडगुजर चाळीसगाव तालुका प्रमुख यांनी केले.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुधा बोरोले
जिल्हा साथरोग अधिकारी ,
डॉ बाळासाहेब वाबळे
जिल्हा साथरोग अधिकारी.
व्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे, श्री रवींद्र पाटील,
औषध निर्माण अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुधीर जगताप, सचिव श्री संतोष जाधव, कोषाध्यक्ष मुकेश पाटील,उपाध्यक्ष संदीप पाटील व श्रीमती प्रियंका मंडावरे ,
श्री पंकज साळुंखे (सहकोषाध्यक्ष) , श्री मनोहर कोळी व श्रीमती संगीता पाटील (सहसचिव) , श्री परेश पाटील , श्री सुरेश मराठे , श्री युवराज रोकडे , श्री मुरलीधर विसावे (सर्व सल्लागार) , श्री प्रशांत मराठे , गणेश साळुंखे , श्री भास्कर पाचपांडे , श्री नितीन गायकवाड , श्री. राजेंद्र चव्हाण
शेख अखिल अब्दुल शकूर(सर्व कार्यकारणी सदस्य) , श्री भावेश थोरात (जळगाव) श्री. नरेंद्र घुले (भुसावळ ) श्री.जाफर फारुकी (मुक्ताईनगर ) ,श्री. रवींद्र महाजन (रावेर ), श्री.मिलिंद पाटील (चोपडा ), श्री. विलास बिऱ्हाडे (अमळनेर ) , श्री गजेंद्र निकम (पारोळा) , श्री. अतुल पाटील (जामनेर ) ,श्री विजय खडके( धरणगाव), श्री. शामकांत पाटील (एरंडोल), श्री विकास धुमाळ (भडगाव) , श्री रवींद्र पाटील (पाचोरा), श्री. विजय बडगुजर (चाळीसगाव) कौशल नेमाडे (यावल) तालुकाप्रमुख व जिल्ह्यातील सर्व फार्मसी ऑफिसर उपस्थित होते.
Comments
Post a Comment