महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर!**गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड, संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय.!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर! गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड, संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! प्रदेश कार्याध्यक्षपदी निलेश सोमानी - राज्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारकडे विविध मागण्यासाठी प्रयत्न करणार! मुंबई : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, न्यूज 18 चे ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यकारिणी नवे धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी, सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची उपस्थिती होती. कार्यक्...