कोठली परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई
राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक सत्यशोध न्यूज
भडगाव, दि. 10 जून 2026 : भडगाव तालुक्यातील कोठली परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. पकडण्यात आलेली वाहने पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय, भडगाव येथे जमा करण्यात आली आहेत.
ही कारवाई मंडळ अधिकारी दिनेश येंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. वाढत्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणासह शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने महसूल विभागाने विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.
कारवाईत ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, गीतेश महाजन, विवेक महाजन, योगेश पाटील, प्रशांत कुंभारे, लोकेश महाजन, करण कुलकर्णी तसेच महसूल सहायक महादू कोळी आणि महसूल सेवक किरण मोरे यांनी सहभाग घेतला.
अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment