“महिला सक्षमीकरणातून ग्रामविकासाचा नवा आदर्श; सरपंच कविता महाजन यांचा लोकमतकडून गौरव”

राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवून आणणाऱ्या एस.एस.एम.एम. ज्युनिअर कॉलेज, पाचोरा येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका तथा कुऱ्हाड खुर्दच्या सरपंच सौ. कविता प्रदीप महाजन यांना लोकमत परिवार आणि बीकेटी टायर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष समारंभात ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील केवळ १४ सरपंचांची या गौरवासाठी निवड करण्यात आली.
सौ. महाजन यांनी गावातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने विविध कौशल्य विकास उपक्रम राबविले आहेत. शिवणकला, मेहंदी कला, बेकिंग, बॅग निर्मिती यांसारख्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांमुळे अनेक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्तीनंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला. यावेळी प्रा. राजेंद्र चिंचोले, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, उपप्राचार्य एस. एस. पाटील, श्री. प्रदीप महाजन, डॉ. अतुल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप (भाऊसाहेब) वाघ, मानद सचिव ॲड. महेश (दादासाहेब) देशमुख, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. एस. झेड. तोतला तसेच संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी सौ. महाजन यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या आर्थिक सबलीकरणातून समाज परिवर्तनाची वाट निर्माण करणाऱ्या सौ. कविता महाजन यांचा हा सन्मान ग्रामीण नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सौ. कविता प्रदीप महाजन यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🌹💐👏

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद