कै.पि.के शिंदे माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपीक श्री एन एस मोलाणे(भोसले) यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

राजेंद्र खैरनार(पाचोरा) मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
       गिरणाई शिक्षण संस्था पाचोरा संचलित कै पिके शिंदे माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपीक श्री एन एस भोसले (मोलाणे) हे २७ वर्षे आठ महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. वरिष्ठ लिपीक म्हणून आपल्या कार्यकाळात अतिशय प्रामाणिक व निष्ठेने सेवा देत व  सर्वांशी सलोख्याचे व आपुलकीचे संबंध जोपासले आहेत. आशीर्वाद हॉल पाचोरा येथे दि. ३० रोजी संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गिरणाई पतसंस्थेचे अध्यक्ष बापूसो सतीश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सौ. सिंधुताई शिंदे, माजी नगरसेविका सौ. विजयाताई शिंदे, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, सौ पूजाताई शिंदे, उपाध्यक्ष निरज मनोत, सचिव अँड भैय्यासाहेब काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे सर, मुख्याध्यापिका श्रीमती एस एस ताड, माजी मुख्याध्यापक एस व्ही गीते यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर व सहकारी उपस्थित होते.             
       कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अमोलभाऊ शिंदे यांनी श्री मोलाणे यांच्या सेवेतील कार्यकाळाचा गौरवोद्गार करत संस्थासलकांशी असलेले कौटुंबिक संबंध व नाते याचा बनाव न करता अतिशय प्रामाणिक व निष्ठेने सेवा दिल्याचे सांगितले. यासह निरज मनोत, सु ना पाटील, सौ विद्या कोतकर, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरांच्या कार्याचा गौरव केला. प्रसंगी उपस्थितांनी श्री एन एस मोलाणे व सौ संगीता मोलाणे यांचा सत्कार करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सूत्रसंचालन डी आर कोतकर यांनी तर आभार पि बी राठोड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद