पहाटेची धडक कारवाई! महसूल-पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम; तहसीलदार विजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पथक मैदानात

राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक सत्य शोध न्यूज 
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यात अवैध व्यवसाय, महसुली नियमांचे उल्लंघन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने पहाटे संयुक्त धडक मोहीम राबविली. तहसीलदार विजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
या विशेष मोहिमेत पोलीस कर्मचारी 1957 ब. दु. सिंग बंजारा, हे.काॅं.1328 गजानन देशमुख तसेच पी.एस.आय. अशोक पाटील यांनी सहभाग नोंदविला. महसूल विभागातील मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, राहुल पवार, ग्राम महसूल अधिकारी दीपक दवंगे, अतुल पाटील, रामकृष्ण बळी, तात्याराव सपकाळ, नकुल काळकर, राजेंद्र शिरसाठ, अविनाश जंजाळे, शिवाजी डोंगरे, अजमल मकानदार, तेजस भऱ्हाटे, अमोल शिंदे, गंगाधर सुरणार, लहू कोळेकर यांच्यासह कोतवाल प्रदीप भुरे, निलेश साळुंखे तसेच वाहन चालक मनोज पाटील व विश्वेश यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध कृत्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून महसूल व पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून संकेत मिळत आहेत.
— प्रशासनाचा दणका, नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ; महसूल-पोलीस यंत्रणेची संयुक्त ताकद पुन्हा एकदा सिद्ध!

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद