वाळू माफियांवर महसूल विभागाचा मोठा घाव!; टास्क फोर्सची धडक कारवाई, दोन बारा चाकी डंपर जप्त


राजेंद्र खैरनार (पाचोरा)मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा : माननीय प्रांताधिकारी भुषण अहीरे यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या टास्क फोर्स पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत मौजे वाक येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन बारा चाकी डंपर पकडले. जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय, पाचोरा येथे जमा करण्यात आली आहेत.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या कारवाईत मंडळ अधिकारी आर.डी.पाटील, राहुल पवार तसेच ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अतुल पाटील, अविनाश जंजाळे, अजमल शहा मकानदार आणि निखिल बळी यांनी सहभाग घेतला.
महसूल विभागाच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, भविष्यातही अवैध वाळू वाहतुकीविरोधात अशाच कठोर मोहिमा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद