परधाडे येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, दि. १० जून २०२६ रोजी मौजे परधाडे येथे अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत, मंडळ अधिकारी श्री. आर. डी. पाटील तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. अविनाश जंजाळे यांनी सहभाग घेतला. संबंधित वाहनाविरुद्ध महसूल विभागाकडून नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील नैसर्गिक संपत्तीची होणारी लूट रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment