“श्रीमद् भागवत कथेनिमित्त भव्य शोभायात्रा रविवारी; भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन”
राजेंद्र खैरनार(पाचोरा) मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा (प्रतिनिधी) : श्रीमद् भागवत कथा सेवा समितीच्या वतीने पाचोरा शहरात श्रीमद् भागवत कथेनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता निघणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समितीच्या माहितीनुसार, श्रीमद् भागवत कथा दि. ७ जून ते १३ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्याच्या प्रारंभी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा देवी मंदिर, रथ गल्ली, गांधी चौक, पाचोरा येथून प्रारंभ होऊन गांधी चौक, जामनेर रोड, चिमुकले राम मंदिर, पाताळेश्वर महादेव मंदिर पुल मार्गे विठ्ठल मंदिर, कृष्णापुरी येथे समाप्त होणार आहे.
श्रीमद् भागवत कथा आणि शोभायात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन भागवत कथा सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे. 🙏🏻🌺
Comments
Post a Comment