टोनगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई; ट्रॅक्टर जप्त

राजेंद्र खैरनार (पाचोरा) मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
भडगाव, दि. 10 जून 2026 : मौजे टोनगाव येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय, भडगाव येथे जमा केला. ही कारवाई मंडळ अधिकारी श्री. दिनेश येंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत श्री. एस. के. मांडोळे (ग्रा.म.अ. अंजन विहिरे), श्री. व्ही. पी. शिंदे (ग्रा.म.अ. कोळगाव), श्री. लोकेश महाजन (ग्रा.म.अ. आंचळगाव), श्री. करण कुलकर्णी (ग्रा.म.अ. तांदूळवाडी), श्री. प्रसाद दुदुस्कर (ग्रा.म.अ. वाक), श्री. गौरव पगारे (ग्रा.म.अ. पिंप्रीहाट) तसेच श्री. किरण मोरे (महसूल सेवक, टोनगाव) यांनी सहभाग घेतला.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरू असून संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद