डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन


राजेंद्र खैरनार (पाचोरा) मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
(धरणगाव वार्ताहर) एरंडोलच्या रा ति काबरे विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक संतोष धनगर यांचे  ज्येष्ठ सुपुत्र तथा धरणगावच्या प रा विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ  अतुल संतोष सूर्यवंशी यांच्या शशी देशपांडे, गीता हरिहरन, मंजू कपूर आणि शोभा डे यांच्या इंग्रजी कादंबऱ्या मधील स्त्री पात्रांचा मनोविश्लेषणात्मक अभ्यास; हा शोधग्रंथ प्राईम बुक हाऊस, जळगाव यांच्यातर्फे नुकताच प्रकाशित करण्यात आला. 
डॉ. अतुल सूर्यवंशी हे पाचोर्‍याच्या एम एम कॉलेजला इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे आतापर्यंत एकूण 30 शोधनिबंध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यमान नगरसेवक सुनील चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, स्पर्धा परीक्षेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य प्रा राजेंद्र चिंचोले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा डॉ जे व्ही  पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस एस पाटील  यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.  भविष्यातही विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे, इंग्रजी ग्रंथसंपदा समृद्ध करणारे पुस्तके लिहिण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद