*स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी*... *आमदार किशोर आप्पा पाटील* *स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्र व समाज हितासाठी कार्य करावे* *प्रा . राजेंद्र चिंचोले* *विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीतांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न*

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चैनल
 स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यासाठी मदत करावी .राज्यात शासनाच्या प्रशासकीय विभागामध्ये महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत  विद्याथ्यांनी नव प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परिसराचा विकास करावा .शहरात अद्यावत वाचनालय व अभ्यासिका असून  त्यात लाखो रुपयांची पुस्तके उपलब्ध आहेत. तालुक्यातील अनेक विद्यार्थी गोरगरीब व शेतकरी कुटुंबातून शिकण्यासाठी येतात  विद्यार्थ्यांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा व चांगला अभ्यास करून अधिकारी बनावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन केले.
      स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्र व समाज हितासाठी कार्य करावे.विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध केले पाहिजे. करिअरच्या अनेक संधी असून त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, परिश्रम व नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश हमखास मिळते. शैक्षणिक बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे असते आपली बुद्धिमत्ता ओळखून व्यावसायिक व कौशल्यपूर्ण बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येकाने जीवनात यशस्वी व्हावे. आपल्या कडील ज्ञान समाजाला कसे उपयोगी होईल यासाठी प्रयत्न करावा व समाजाच्या तळागाळातील विद्यार्थी हा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने देश सेवेसाठी सहभागी झाला पाहिजे. स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी होणे, हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, शिस्त व नियोजनबद्ध अभ्यास केल्यास या स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच यश मिळते, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक  प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले.

  तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा भडगाव शिवसेना युवा सेना यांच्या पुढाकारातून विविध
स्पर्धा परीक्षेत व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ,  पाचोरा येथे माननीय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी 
 श्री भूषणअहिरे( प्रांताधिकारी पाचोरा),   श्री विजय बनसोडे( तहसीलदार पाचोरा), श्री  ), श्री मंगेश देवरे (मुख्याधिकारी) 
श्री रावसाहेब पाटील 
 (जिल्हा अध्यक्ष शिवसेना), श्री गणेश  पाटील
 (सभापती 
 कृषी उत्पन्न बाजार समिती) , श्री किशोर बारावकर(उपनगराध्यक्ष) , श्री संजय गोहिल( माजी नगराध्यक्ष), श्री शरद पाटे (माजी उपनगराध्यक्ष ),श्री. राजेंद्र पाटील,.श्री. विनोद तावडे,,श्री. सुमित सावंत,श्री. भोला पाटील,श्री रहेमान तडवी ,रहीम बागवान, अशोक पाटील हे होते.

प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक क्षेत्रात युवकांना देशाचे नाव उंचावण्याची संधी आहेत.स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी करिअर करावे, असे आवाहन केले. 

नगरपालिका मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी केंद्रीय पातळीवरील इतर स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे आहेत. त्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी करावी. आज प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्याची युवकांना संधी आहे, अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.



    सत्कारार्थींमधून गौरव गोसावी, गरिमा पाटील, राहुल खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी , यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक गजू पाटील, राजेश पाटील, नाना वाघ, बबलू पाटील ,नितीन पाटील, विजय भोई यांचे सहकार्य लाभले.
 प्रास्ताविक गजू पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन नाना वाघ यांनी करुन आभारही मानले.


 *मुख्य  सत्कारार्थी* 

गौरव गणेश गोसावी (डेप्युटी मॅनेजर , न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ),ऋषिकेश पाटील(  न्यायाधीश पदी निवड.),हर्षल अरुण पाटील 
(बँक प्रोबेशनरी ऑफिसर  व इन्कम टॅक्स सुपरिटेन्डन्ट  )
 ,*रोहित आत्माराम महाजन* - (-STI )
 ,युगंधरा राजेंद्रसिंग पाटील  (STI)
 ,निरंजन भालेराव पाटील* - STI 
  ,स्वप्नील गोपाळ पाटील* (-   नगर रचनाकार)
     
 ईश्वरी बाळकृष्ण पाटील* -  (नगररचनाकार)
गरिमा निकित पाटील* -  (कर सहाय्यक.),
 सिद्धार्थ चौधरी* (आयकर निरीक्षक),
अजय सिंग परदेसी (पीएसआय), योगेश जाधव (पीएसआय),
जितेंद्र दिलीप पाटील*
 ( वैज्ञानिक सहाय्यक), .
शैलेंद्र गुलाब पाटील*
 -(विश्लेषक, न्यायवैद्यक )

पोलीस व इतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी *८३* मुलांचा सत्कार 

 *अमेय मोराणकर* जेईई परीक्षेतील यशाबद्दल सत्कार

 क्रीडा क्षेत्रातील राज्य पातळीवर यश मिळणाऱ्या *६* खेळाडूंचा सत्कार.

 पोलीस भरती मार्गदर्शन करणाऱ्या ३ शिक्षकांचा सत्कार .
 *सुभाष रामदास राठोड यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार* मिळाल्याबद्दल सत्कार

एकूण *१०५* जणांचा सत्कार

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद