"सबका साथ, सबका विकास”चा आदर्श; पाचोरा नगरसेवकांचा पुणे-केरळ अभ्यास दौरा शहर विकासाला देणार नवी दिशा


राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नगरपालिकेच्या कामकाजात अधिक गुणवत्ता, शिस्त व दूरदृष्टी निर्माण व्हावी या उद्देशाने पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील व नगराध्यक्ष सुनीता किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा पुणे तसेच केरळ येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यामुळे नवोदित लोकप्रतिनिधींना आधुनिक शहर व्यवस्थापन, स्वच्छता, नागरिक सुविधा आणि विकास आराखड्यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

पाचोरा नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यास दौऱ्यात नगरसेवकांना पुणे येथील नागरी प्रशासन, स्वच्छता व्यवस्थापन, रस्ते नियोजन, सार्वजनिक सुविधा, उद्यान विकास तसेच शहर सुशोभीकरण याबाबत सखोल माहिती देण्यात आली. शहराचा विकास केवळ निधीवर होत नसून नियोजन, शिस्त आणि लोकसहभाग यावर अवलंबून असतो, हा महत्त्वाचा संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.

यानंतर नगरसेवकांना केरळ राज्यातील विविध शहरांना भेट देण्यात आली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि नागरिकाभिमुख सुविधा यासाठी देशभरात ओळख असलेल्या केरळमधील विविध ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला. विशेषतः मुन्नार येथील निसर्गरम्य परिसर, स्वच्छ रस्ते, सुशोभित उद्याने, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून नगरसेवक प्रभावित झाले.

या संपूर्ण दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कोणताही पक्षीय मतभेद न ठेवता सेना, भाजप तसेच अपक्ष अशा सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन “सबका साथ, सबका विकास” ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. राजकारणापेक्षा शहर विकासाला प्राधान्य देत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पाचोरा शहर भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील आदर्श, स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळखले जावे, हीच आमदार किशोर आप्पा पाटील यांची संकल्पना असून त्यादृष्टीने हा अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नगरसेवकांनीही या दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग शहराच्या विकासासाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाचोरा शहराच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आगामी काळात शहराच्या प्रगतीसाठी निश्चितच नवी ऊर्जा देणारे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद