दि. ७ मे २०२६ रोजी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार दिलीप पाटील यांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्ती सत्कार संपन्न
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
दि. ७ मे २०२६ रोजी पाचोरा पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष व जनतेशी आत्मीयतेचे नाते जपणारे पोलीस हवालदार श्री. दिलीप पाटील दादा यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रामाणिक व निष्ठावान सेवेनंतर त्यांनी पोलीस खात्यातील आपला सेवाकाळ पूर्ण केला.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या हस्ते श्री. दिलीप पाटील दादा यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस सेवेत कार्यरत असताना श्री. दिलीप पाटील दादा यांनी शिस्त, जबाबदारी व जनसेवा या मूल्यांना प्राधान्य देत आपले कर्तव्य पार पाडले. कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी नागरिकांशी सुसंवाद ठेवत पोलीस विभागाची सकारात्मक प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या शांत, संयमी व मदतीच्या स्वभावामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना निर्माण झाली होती.
समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत “सेवानिवृत्ती ही एका जबाबदारीच्या पर्वाची सांगता असली तरी समाजातील योगदानाची नोंद कायम स्मरणात राहणारी असते,” अशा भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान व दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर, सुनील पाटील, पांडुरंग सोनवणे, अशोक पाटील, हवालदार भगवान उमाळे, हरीश अहिरे, दीपक पाटील, भोजराज धनगर, संदीप राजपूत, गणेश कुवर, शरद पाटील, संदीप भोई, कमलेश राजपूत, योगेश पाटील, प्रवीण परदेशी, प्रकाश सूर्यवंशी, हवालदार रमेश कुमावत, पोलीस बॅाईज असोसिएशन अध्यक्ष
पोलीस दलातील आपल्या कार्यातून समाजात आदर्श निर्माण करणारे दिलीप पाटील दादा यांचे योगदान पाचोरा शहर कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment