“तक्रारीला तत्काळ प्रतिसाद; मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या कार्यतत्परतेमुळे पुजारी नगर प्रवेशद्वारावरील धोकादायक खड्डा त्वरित बुजवला” जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांकडून नगरपालिकेच्या कार्यशैलीचे कौतुक



पाचोरा शहरातील तलाठी कॉलनीजवळ असलेल्या पुजारी नगरच्या प्रवेशद्वाराजवळ गटारीवरील ढापा तुटल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

या गंभीर समस्येची माहिती परिसरातील डॉक्टर श्री. घनश्याम चौधरी यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले यांना फोटोसह दिली. त्यानंतर अनिल आबा येवले यांनी सदर बाब व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मांडत तातडीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्यापर्यंत पोहोचवली.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेत मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी तत्काळ दखल घेत बांधकाम विभागाला त्वरित सूचना दिल्या. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे संबंधित ठिकाणचा धोकादायक खड्डा अल्पावधीत बुजविण्यात आला.

मुख्याधिकारी मंगेश देवरे हे समस्यांवर तातडीने प्रतिसाद देणारे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे कार्यक्षम अधिकारी असल्याची भावना यानिमित्ताने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये व्यक्त झाली. प्रशासनातील तत्परता आणि लोकप्रतिनिधी, पत्रकार व नागरिक यांच्यातील समन्वय असेल तर अनेक प्रश्न वेगाने मार्गी लागू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

खड्डा बुजवल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरपालिकेच्या तातडीच्या कार्यवाहीचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद