आमदार रोहित पवार यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुशीलाबाई तावडे यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस…

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा, अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे Rohit Pawar यांनी पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गोंडगाव येथे घडलेल्या बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी कनाशी येथील तीर्थस्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.

यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्ते श्री नितीन भाऊ तावडे यांच्या मातोश्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुशीलाबाई तावडे यांची श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सुशीलाबाई तावडे यांचा आशीर्वाद घेत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी माजी आमदार श्री सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद पाटील, प्रदेश सरचिटणीस श्री एजाज मलिक, जिल्हाध्यक्ष सौ. कल्पिता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दिलीप खोडपे, श्री अजहर खान, श्री अन्वर खाटीक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांनी श्री नितीन तावडे व स्थानिक कार्यकर्त्यांशी दिलखुलास संवाद साधत पक्ष संघटन, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या अडचणींबाबत चर्चा केली. त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि कार्यकर्त्यांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद