भाजयुमो जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश मधुकर ठाकूर यांची निवड; युवक संघटनाला मिळाले नवे नेतृत्व....तळागाळातील कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाची मोठी संधी
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामधील सक्रिय, अभ्यासू आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे युवा कार्यकर्ते योगेश मधुकर ठाकूर यांची भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत सातत्याने केलेल्या प्रभावी व निष्ठावान कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
योगेश ठाकूर यांनी भाजयुमोमध्ये कार्यकारिणी सदस्य, शहर चिटणीस, शहर सरचिटणीस तसेच शहराध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत संघटन मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. युवकांना भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी जोडणे, नव्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे तसेच सामाजिक, जनहिताचे आणि संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाचोरा शहर व परिसरात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. बूथस्तरावर पक्ष बळकट करणे, युवकांमध्ये संघटन विस्तार करणे तसेच पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
योगेश ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे भाजयुमोच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल तसेच युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीनंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतील नागरिकांकडून योगेश ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Comments
Post a Comment