पाचोरा पोलीस अंमलदार संदीप भोई यांचा पुतण्या जयेश भोई ठरला पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रथम; इन कॅमेरा परीक्षेतही पिटीसीची दैदिप्यमान बाजी!
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोधन न्यूज
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने यंदाच्या अत्यंत कडक आणि “इन कॅमेरा” पद्धतीने पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची खरी कसोटी पाहणाऱ्या या परीक्षेत संस्थेच्या विविध विद्यालयांनी घवघवीत यश मिळवत शिक्षण क्षेत्रात आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे.
विशेष म्हणजे, भडगाव येथील सौ. सु.गी. पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जयेश संभाजी भोई याने तब्बल ९८.२० टक्के गुण मिळवत पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जयेशवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यामध्ये आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप किसन भोई यांचे पुतणे जयेश संभाजी भोई यांनी हे दैदिप्यमान यश मिळवून भोई कुटुंबासह पाचोरा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
संस्थेच्या विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे. अनेक शाळांनी उत्कृष्ट निकाल नोंदवत ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील गुणवत्तेत कुठेही कमी नसल्याचे सिद्ध केले आहे.
श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा
या विद्यालयाचा निकाल ८७.२० टक्के लागला असून ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
प्रथम – ललित बळवंत आंबेकर – ९४.६०%
द्वितीय – हर्षल शैलेंद्र चौधरी – ९४.६०%
तृतीय – मोहित गणेश पाटील – ९२%
चतुर्थ – स्वरूप अशोक राठोड – ९१%
पाचवा – खुशी मनोहर सोनवणे – ९०%
सौ. सु.गी. पाटील माध्यमिक विद्यालय, भडगाव
विद्यालयाचा निकाल ८३.८३% लागला असून १६७ पैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.
प्रथम – जयेश संभाजी भोई – ९८.२०%
द्वितीय – गौरव संदीप महाजन – ९५%
तृतीय – आदित्य उमाकांत शिंपी – ९१%
चतुर्थ – नंदिनी नारायण पाटील – ८९%
पाचवा – तेजस संदीप पाटील – ८६.६०%
डॉ. राम मनोहर लोहीया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बांबरुड (राणीचे)
विद्यालयाचा निकाल ५०.४१% लागला.
प्रथम – कुणाल योगेश डिके – ७७.५०%
द्वितीय – दर्शन अशोक पाटील – ७७.४०%
तृतीय – चंचल बापू शिंदे – ७३.६०%
श्री. एच. बी. सांघवी हायस्कूल, खेडगाव नंदीचे
विद्यालयाचा निकाल ७६.४७% लागला.
प्रथम – मयुरी अनिल बागुल – ८७.२०%
द्वितीय – शहबाज अमीन मन्यार – ७९%
तृतीय – वेदश्री सुनील बाविस्कर – ७७.४०%
श्री. शां. न. जैन माध्यमिक विद्यालय, वाडी
विद्यालयाचा निकाल ७३.३३% लागला.
प्रथम – राजवीर अमर काकडे – ८४.४०%
द्वितीय – हर्षल संभाजी पाटील – ७६.४०%
तृतीय – रोहित प्रकाश पाटील – ७२.८०%
श्री. सु.वि. माध्यमिक विद्यालय, माहेजी
विद्यालयाचा निकाल ७३.६८% लागला.
प्रथम (विभागून) – कृष्ण संजय कदम – ७७.६०%
प्रथम (विभागून) – भूमिका अनिल भगत – ७७.६०%
द्वितीय – विनीत संजय शिरसाठ – ७४.६०%
तृतीय – कोसर शरीफ हरदास – ६५%
आदर्श माध्यमिक विद्यालय, कुऱ्हाड खुर्द
विद्यालयाचा निकाल ८१.३९% लागला.
प्रथम – वैभव सुभाष देवरे – ८२.४०%
द्वितीय – हर्षदा संभाजी वंजारी – ७९.८०%
तृतीय – विवेक प्रमोद बोरसे – ७९.६०%
श्रीमती च. ही. राजपूत माध्यमिक विद्यालय, दहीगाव संत
विद्यालयाचा निकाल ८६.६६% लागला.
प्रथम – भाग्यश्री संजय कोळी
द्वितीय – भाग्यश्री अनिल चौधरी
तृतीय – काजल तुळशीराम कोळी
महात्मा फुले हायस्कूल, भोजे चिंचपूरे
विद्यालयाचा निकाल ८६.६६% लागला.
प्रथम – भाविका डीगंबर पाटील – ८८.४०%
द्वितीय – जागृती धनराज जाधव – ८३.८०%
तृतीय – जीविका सुनील जाधव – ८२%
पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय, सातगाव डोंगरी
विद्यालयाचा निकाल ५९.२५% लागला.
प्रथम – राहुल हिरमल बारेला – ६८.६०%
द्वितीय – सलोनी फरीद तडवी – ६७.२०%
तृतीय – अनिल झाका बारेला – ६५.८०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, स्थानिक शाळा समितीचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment