उन्हाच्या झळांत मजुरांना दिलासा; लिनेस क्लब पाचोराचा श्रमिकांप्रती जिव्हाळ्याचा उपक्रम


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : श्रमिकांच्या कष्टाला सलाम करत सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवत लिनेस क्लब पाचोरा यांच्या वतीने दि. ३० एप्रिल २०२६ रोजी हातगाडी मजुरांसाठी उन्हापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने बागायती रुमाल व पादत्राणे वितरण करण्यात आले. तसेच १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर कामगार वर्गाच्या कुटुंबातील लहान मुलांना वही व चॉकलेटचे वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून देण्यात आला.
हा उपक्रम लिनेस क्लबच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत उत्साहात पार पडला. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर मेहनत करणाऱ्या हातगाडी मजुरांना या उपक्रमातून मोठा दिलासा मिळाला.
यावेळी पादत्राणांचे वितरण सौ. प्रिया लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. लिनेस क्लबच्या फंडमधून बागायती रुमालांचे वाटप करण्यात आले. तसेच कामगारांच्या कुटुंबातील मुलांना वही वितरण श्रीमती रूपाली पाटील यांनी तर चॉकलेटचे वितरण श्रीमती राजश्री जैन यांनी केले.
कार्यक्रमास लिनेस क्लबच्या कोषाध्यक्षा श्रीमती संगीता सिसोदिया, श्रीमती सदामिनी पाटील, शेवंती मोनिका थेपडे, श्रीमती मंजू अग्रवाल, श्रीमती अंकिता अग्रवाल आदी सदस्य उपस्थित होत्या.
उपक्रमाच्या शेवटी क्लब सदस्य श्रीमती रूपाली पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील गरजू व श्रमिक घटकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद