“ज्यांच्या हातांनी नेहमी शहर स्वच्छ होते, त्या हातांचा पहिल्यांदाच झाला मानाचा सन्मान”...प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेविकापती अशोक (आप्पा) पुंडलिक पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साफसफाई कर्मचारी व अग्निशमन दलाचा अनोखा आणि मनाला स्पर्श करणारा सत्कार...!

राजेंद्र खैरनार:- मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल 
पाचोरा प्रतिनिधी :
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १४ तर्फे नगरपालिका सफाई कर्मचारी, मुकरदम तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा अत्यंत अनोख्या व भावनिक वातावरणात सत्कार करण्यात आला. नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील व नगरसेविकापती अशोक (आप्पा) पुंडलिक पाटील ,नगरसेवक प्रदिप भगवान वाघ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने सर्व साफसफाई कामगारांच्या मनाला स्पर्श केला.
“कामगार" हा महाराष्ट्राचा कणा आहे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी "कामगारा" शिवाय कोणतेही कार्यपूर्ण होऊ शकत नाही,” असा संदेश देत या मेहनती कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डिसेंबर २०२५ मध्ये नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर पाचोरा शहरातील प्रत्येक प्रभागात साफसफाई, अंडरग्राउंड गटार स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी सातत्याने कार्यरत राहिले. सकाळपासून दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेविकापती अशोक आप्पा पाटील यांनी कामगार दिनी(महाराष्ट्रदिनी) त्यांचा विशेष सन्मान करण्याचा अनमोल व मनाला स्पर्श करणारा निर्णय घेतला.
यावेळी प्रत्येक महिला व पुरुष कर्मचाऱ्याला शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “आजपर्यंत अनेक नगरसेवक पाहिले, मात्र आमच्या कामाची दखल घेऊन इतक्या आत्मीयतेने सत्कार करणारे नगरसेविकापती अशोक आप्पा पाटील हे वेगळे आणि माणुसकी जपणारे नगरसेवक आहेत. आमचे मन भरून आले.”
या कार्यक्रमास नगरसेवक प्रदीप भगवान वाघ, स्वीकृत नगरसेवक अविनाश सुतार, ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, पत्रकार राजेंद्र खैरनार, सुधीर पाटील, गजानन रोकडे, गणेश पाटील तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
सत्कार करण्यात आलेले सफाई कर्मचारी व मुकरदम : मुकरदम वाल्मिक गायकवाड,
प्रतिभाबाई चंदू भैरू, प्रतिभाबाई शरद सूर्यवंशी, मोनिका सागर पारोचे, ललित विजय पाटील, रवींद्र प्रकाश लाहासे, ऋतिक रविचंद्र ब्राह्मणे, चंद्रकांत संजय जगताप, दीपक प्रल्हाद ब्राह्मणे, सागर अनिल ब्राह्मणे, विष्णू अहिरे, भीमराव महिरे, सचिन चव्हाण, गणेश बागुल, कुणाल पाटील, आशिष रक्षे, पंकज पाचगे, विजय सावळे, राज जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
अग्निशमन दलातील सत्कारमूर्ती :
राजूभाऊ पाटील, फिरोज खान, दीपक पाटील, अनिल बागुल, संकेत पाटील यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
कामगार दिनी घेतलेला हा उपक्रम शहरात कौतुकाचा विषय ठरत असून, “सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने श्रमिकांचा गौरव” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद