गिरणाई शिक्षण संस्था संचलित श्री पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा विद्यालयाचा दैदिप्यमान निकाल; 96.42 टक्के यश संपादन
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित श्री पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 96.42 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यालयातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —
🥇 १) कस्तुरी रजनीकांत चित्ते — 91.60% — प्रथम
🥈 २) ऋतुजा रवींद्र शिंपी — 90% — द्वितीय
🥉 ३) निखिल संदीप पाटील — 85.40% — तृतीय
🏅 ४) साई नारायण धनगर — 84% — चतुर्थ
🏅 ५) आर्यन सुनील पाटील — 83% — पाचवा
🏅 ५) मोहिनी नामदेव पाटील — 83% — पाचवी
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्यासाहेब पंडितराव परशराम शिंदे, सचिव आदरणीय दादासाहेब जे. डी. काटकर, उपाध्यक्ष नीरजभाऊ मुणोत, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, सहसचिव डॉ. प्रा. शिवाजीराव शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment