कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचा दणदणीत निकाल; 96.19% यशाची उज्ज्वल परंपरा कायम..!

 राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. परशराम कोंडीबा शिंदे माध्यमिक विद्यालय, विवेकानंद नगर, पाचोरा ता. पाचोरा जि. जळगाव या विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 96.19% निकालाची उज्ज्वल नोंद केली आहे. विद्यालयाच्या या यशामुळे संपूर्ण पाचोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयातून एकूण 184 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 72 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून 67 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 31 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले आहे. तसेच विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष गुणवत्ता सिद्ध केली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —
🥇 समृद्धी योगेश येवले — 97.20%
🥈 चैताली सुनिल वानखेडे — 96.60%
🥉 सेजल संदीप राठोड — 95.00%
🏅 अपेक्षा प्रशांत निकुंभ — 94.80%
🏅 भावेश भरत पाटील — 93.80%
🏅 स्पंदन गणेश सोमवंशी — 93.80%
या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासो. पंडितराव पी. शिंदे, सचिव अॅड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष निरजभाऊ पी. मुणोत, युवानेते अमोलभाऊ शिंदे, सहसचिव डॉ. प्रा. शिवाजी शिंदे, माजी मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर,नुतन मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.ताड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पुनगाव रोड, पाचोरा येथील कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय ने मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद