पाचोरा कन्या विद्यालय बारावीचा निकाल 83 टक्के


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा-  येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयातील बारावी कला शाखेचा निकाल 83.01% लागला असून गौरी ईश्वर धनगर हिने 69  मार्क मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील 53 पैकी 44 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. घवघवीत यश संपादन करणाऱ्या प्रथम पाच विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे 
 गौरी ईश्वर धनगर(69:00),   
 दिशा भगवान कोळी (64:83),
 वैष्णवी रवींद्र खैरनार (64:00)
नयना हेमराज चौधरी (63:34)
कीर्ती कैलास दाभाडे (63:17),
झीनत असलम शेख (63:17)

 संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार, सेक्रेटरी श्रीमती रूपालीताई जाधव-पवार व प्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रा.रवींद्र चव्हाण, प्रा अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा परदेशी, प्रा. प्रतिभा पाटील व प्रा संगीता राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद