"अलिगढपर्यंत धडक मोहीम! पोहेकॉ. ज्ञानेश्वर महाजन यांची गुन्हे उघडकीस आणणारी कामगिरी; जळगाव पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्राने गौरव”


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोधन
पोलिस दलातील कर्तव्यदक्षता, चिकाटी आणि तपासातील बारकावे यांचा उत्कृष्ट नमुना पुन्हा एकदा समोर आला असून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ.) क्र. 1017 श्री. ज्ञानेश्वर संतोष महाजन यांनी दाखवून दिलेली कामगिरी ही संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
CCTNS No. 474/2025 अंतर्गत BNS कलम 308(1), (2) या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीची ओळख पटविणे, त्याचा माग काढणे आणि थेट उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे जाऊन त्याला ताब्यात घेणे ही अत्यंत कौशल्यपूर्ण व धाडसी कारवाई मानली जाते. राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन आरोपीचा शोध घेणे हे केवळ धैर्याचे नव्हे तर तांत्रिक तपास कौशल्याचेही द्योतक आहे.
यापुढे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळाली असून कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) यांनी पोहेकॉ. ज्ञानेश्वर महाजन यांना प्रशंसापत्र प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उल्लेखनीय कार्य पार पडले असून, त्यांच्या हस्तेच पोहेकॉ. ज्ञानेश्वर महाजन यांना प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले, ही बाबही विशेष उल्लेखनीय आहे.
त्यांच्या या कार्यामुळे संपूर्ण पोलीस दलाचा गौरव वाढला असून कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख अधिक बळकट झाली आहे. आजच्या काळात गुन्हेगारीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत असताना अशा प्रकारच्या धाडसी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम तपासामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ होत आहे.
पोहेकॉ. महाजन यांचे हे कार्य नव्या पिढीतील पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. पोलिस दलात अशा प्रकारची कार्यक्षमता, निष्ठा आणि धैर्य जपले गेले तर न्यायव्यवस्थेची परंपरा अधिक सक्षम होईल, यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद