रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून अक्षर लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज 
रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून श्रीमती कसळाबाई पवार आश्रमशाळा वरसाडे तांडा येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली,सचिव डॉ अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य भरत सिनकर,डॉ सिद्धांत तेली,नितीन तायडे उपस्थित होते. एस. बी.राठोड सर मुख्याध्यापक माध्य.,सतिश राठोड सर मुख्याध्यापक प्राथ.,पर्यवेक्षक मालकर सर,संजय पाटील सर, अनिल महाजन सर,शाह सर तसेच यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. सुंदर अक्षर हाच खरा दागिना असल्याचे रोटरी अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी सांगितले.स्नेहल राठोड,मोहिनी जाधव, शिवानी चव्हाण,अश्विनी पाटील,रोहित राठोड,पायल राठोड,परी शाह,मंगला राठोड,निकिता राठोड, आरीप तडवी या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाले.विजेत्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका श्रीमती अनिता तेली यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब तर्फे परशुराम पवार सर यांचे देखील पुस्तक भेट देऊन कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृत्युंजय शाह सर यांनी केले.
यावेळी शाळेतील 750 विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद