स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळाव्यासह किशोरआप्पा पाटील यांचा भव्य सत्कार...

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम आणि जनगणना या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे पाचोरा येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन देण्याचा पक्षाचा उद्देश असून, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
याच अनुषंगाने शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कारही आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा दि. ०६ एप्रिल २०२६ (सोमवार) रोजी सकाळी १० वाजता, पाचोरा येथील समर्थ लॉन्स, जुना सारोळा रोड येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यास पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विविध अंगीकृत संघटना, लोकप्रतिनिधी, तसेच सर्व स्तरांवरील पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मेळाव्यास जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार असून, निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती, संघटनात्मक नियोजन आणि मतदारांशी संपर्क वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या सर्वांसाठी सुरुची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद