“आप्पासाहेबांची जनसेवा पुन्हा अधोरेखित; ‘तुमचे आरोग्य, आमचे प्राधान्य’ म्हणत मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिरातून हजारो डोळ्यांना नवा प्रकाश!”
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा / भडगाव (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या कार्यपद्धतीमुळे मा. कार्यसम्राट आमदार श्री. किशोरआप्पा पाटील यांची जननेतृत्वाची ओळख अधिकच भक्कम होत आहे. शिवसेना आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेले विनामूल्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
या उपक्रमांतर्गत रुग्णांची नेत्र तपासणी पूर्णतः मोफत केली जात असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया अवघ्या 20 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत यशस्वीरीत्या पार पाडली जाते. विशेष म्हणजे, जळगाव येथील कांताई नेत्रालयात जाण्या-येण्याची सोय, तसेच मुक्कामादरम्यान चहा, नाश्ता व जेवणाची सुविधा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
“सर्व प्रकारच्या नेत्रसेवा एकाच छताखाली” या ध्येयातून रुग्णांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा मिळत आहे. केवळ रक्त तपासणीसाठी 300 रुपये शुल्क असून, शिबिरासाठी येताना आधार कार्ड व रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पाचोरा येथे दर महिन्याच्या 8 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय (शिवसेना मध्यवर्ती कार्यालय) येथे, तर भडगाव येथे दर महिन्याच्या 15 तारखेला आशीर्वाद प्लाझा येथील शिवतीर्थ (शिवसेना मध्यवर्ती कार्यालय) येथे हे शिबिर नियमितपणे आयोजित करण्यात येत आहे.
जनतेच्या आरोग्यविषयक गरजांची जाणीव ठेवत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवून आमदार किशोरआप्पा पाटील यांनी “जनतेचा नेता” ही ओळख अधिक दृढ केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वैभव राजपूत – 8446414072 (पाचोरा)
निलेश पाटील – 8600884707 (भडगाव)
— राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चैनल
Comments
Post a Comment