“पाचोरा प्रशासनाचा डिजिटल वेग वाढणार! २१ लॅपटॉप व ६१ प्रिंटरचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते वाटप”
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा, दि. २ एप्रिल २०२६ — तहसील कार्यालय पाचोरा येथे आज पाचोरा तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी लॅपटॉप व प्रिंटर वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे, निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत तसेच नायब तहसीलदार (महसूल) श्री. प्रमोद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील व उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे यांच्या हस्ते एकूण २१ लॅपटॉप व ६१ प्रिंटरचे वाटप करण्यात आले. यामुळे महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत यांनी केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जलद सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी, पाचोरा तालुक्यासाठी ही तंत्रसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत यांनी मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment