श्रमिक राष्ट्र कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची जळगावहून दमदार सुरुवात; कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शिवसेना मैदानात



राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चैनल
जळगाव | प्रतिनिधी
शिवसेना प्रणीत श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात जळगाव येथून होत असून, कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आता संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत या निमित्ताने देण्यात आले आहेत. कामगारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार घेऊन संघटना मैदानात उतरत आहे.

या पार्श्वभूमीवर श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत मंगलम हॉल ,टाटा शो रूम जवळ ,जळगाव येथे पार पडणार आहे.

या बैठकीस संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून कामगार संघटनेच्या बळकटीकरणासोबतच आगामी रणनीती, संघटन विस्तार आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करणार आहेत.

बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण, प्रदेश अध्यक्ष (सफाई कामगार सेल) श्री. संतोष मकवाना, प्रदेश संघटक श्री. नानासाहेब बच्छाव तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. जितेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत कामगारांच्या विविध समस्या, अन्यायाविरुद्ध लढा, सदस्य नोंदणी मोहीम आणि संघटनेच्या विस्तारावर विशेष भर दिला जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी सर्व मान्यवरांचे जळगाव नगरीत उत्साहात स्वागत करण्यात येणार असून, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. मेजर के. एन. पाटील हे कार्यभार सांभाळणार आहेत.

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीस यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद