पाचोरा पोलिसांची धडक कारवाई : उघड्यावर दारू पिणारे व टवाळखोर २५ जणांवर कारवाई
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाचोरा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा कडक भूमिका घेत प्रभावी धडक कारवाई केली. उघड्यावर दारू पिणे तसेच सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करून नागरिकांना त्रास देणाऱ्या इसमांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या कालावधीत पाचोरा शहर व परिसरात ही कारवाई करण्यात आली. शहरातील भास्कर नगर, भवानी नगर, त्र्यंबक नगर, संभाजी नगर, वाल्मीक नगर, आठवडे बाजार, बाहेरपुरा आदी विविध भागांत पोलिसांनी अचानक धाडी टाकत उघड्यावर मद्यपान करणारे व टवाळखोरी करणारे इसम पकडले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांमध्ये दिपक साहेबराव देसले, प्रकाश शिवाजी शिंदे, अमोल बंडु जाधव, रमेश बारकु चव्हाण, किरण धनराज बागुल, वाल्मीक रमेश माळी, रमेश शांताराम पाटील, आकाश अनिल पवार, अमोल भगवान पाटील, गौरव कैलास सोनवणे, चेतन विश्वनाथ मोरे, गुडडु गोपीचंद कौतीक, किरण लक्ष्मण पाटील, प्रशांत महारु पाटील, तुकाराम आनंदा पाटील, मुनाफ भिकिन पिंजारी, नाना अवचित पाटील, गौतम देविदास वावड, सचिन आण्णा शिंगाडे, प्रशांत आण्णासाहेब जाधव, प्रविण नाना सोनवणे, गणेश युवराज कोळी, साहेबराव विश्वासराव पाटील, नानासाहेब मोतीराम मोरे व दिपक मदनलाल किर यांचा समावेश आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशान्वये राबविण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व गैरवर्तनामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे पाचोरा शहरात शिस्त व सुरक्षिततेचा संदेश गेला असून नागरिकांकडून पाचोरा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment