"फोन लावा आणि नगरसेविकापती अशोक आप्पा हजर! २४ तास जनतेसाठी सज्ज — नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील यांच्या सहकार्याने अंधारातून प्रकाशाकडे नेणारे जनतेच्या मनामनात राज्य करणारे दिलदार, उदार, नि:स्वार्थी नेतृत्व”
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा:- कृष्णापुरी, त्र्यंबकनगर, गुरूदत्त नगर, कोंडवाडा गल्ली, रंगार गल्ली, देशपांडे वाडा, आठवडे बाजार व शिव कॉलनी या परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिलावर्ग रोज पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी सारोळा रोडवर जात असतात. मात्र, या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना, मोठ्या भीतीच्या वातावरणात फिरावे लागत होते.
समोरून येणारी वाहने दिसत नसत, एखादे जनावर अचानक समोर आल्यास अपघाताचा धोका निर्माण होत होता. त्यामुळे आरोग्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठीच हा मार्ग असुरक्षित बनला होता.
ही गंभीर बाब त्या भागातील जागरूक नगरसेविकापती व समाजसेवक श्री. अशोक आप्पा पाटील तसेच नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणतीही विलंब न करता पुढाकार घेतला. “फोन लावा आणि अशोक आप्पा हजर” अशी ओळख असलेल्या आप्पांनी तात्काळ नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत ही समस्या मांडली.
नगराध्यक्षा सौ. सुनीताताई किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष श्री. किशोर बारवकर, गटनेते श्री. सुमित किशोर आप्पा पाटील तसेच मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्या सहकार्याने आणि नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सारोळा रोडवर तातडीने स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्या.
या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे पूर्वी अंधाराने व्यापलेला परिसर आता प्रकाशमय झाला आहे. आज या रस्त्यावर महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस/लष्कर भरतीसाठी तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सकाळी व्यायामासाठी येताना दिसत आहेत. यामुळे केवळ सुरक्षितता वाढली नाही, तर नागरिकांच्या आरोग्यालाही चालना मिळाली आहे.
नगरसेविकापती अशोक आप्पा पाटील व नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे केवळ समस्या सोडवणे नव्हे, तर जनतेच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी ओळखून केलेली संवेदनशील कृती आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून कौतुक करत “नगरसेवक-नगरसेविका असावेत तर असे — जनसामान्यांच्या अडचणी ओळखून तत्काळ उपाय करणारे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
खरंच, गोरगरिबांच्या हाकेला क्षणाचाही विलंब न करता धावून जाणारे, २४ तास जनसामान्यांसाठी उभे राहणारे आणि कृतीतून विश्वास जिंकणारे नगरसेविकापती अशोक आप्पा पाटील व नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील हे आज जनतेच्या मनामनात घर करून राज्य करत आहेत. त्यांच्या शांत, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे आणि जनहिताच्या कार्यामुळे ते समाजासाठी एक प्रेरणादायी नेतृत्व ठरत आहेत.
Comments
Post a Comment