कोळगाव महाविद्या लयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कोळगाव (प्रतिनिधी):
येथील कर्मवीर तात्या साहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय आणि गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि शिस्त बद्ध वातावरणात साज री करण्यात आली प्रतिमापूजन व दीपो त्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेड कर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन कर ण्यात आले. महाविद्या लयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य अनिल हरी पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन संपन्न झाले. याप्रसंगी संपूर्ण महा विद्यालय परिसर 'जय भीम' च्या घोषणांनी आणि उत्साहाने दुम दुमून गेला होता गणवेशातून जपली एकवाक्यता या कार्य क्रमाचे विशेष आक र्षण म्हणजे महाविद्या लयातील शिस्त. कार्य क्रमासाठी सर्व पुरुष कर्मचारी पांढऱ्या शुभ्र गणवेश तर महिला कर्मचारी पारंपरिक जांभळ्या साडीमध्ये उपस्थित होत्या.या एकसमान पेहरावामुळे कार्यक्रमात कमालीची एकवाक्यता, भव्यता आणि शिस्त दिसून आली, ज्याचे उपस्थि तांकडून कौतुक कर ण्यात आले. विचारांची मांडणी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.एम. टी. पाटील (राज्यशास्त्र विभाग प्रमुख )यांनी डॉ. बाबासाहेब आंबेड करांच्या जीवनकार्या वर आणि त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र आजही विद्यार्थ्यां साठी आणि समाजा साठी कसा प्रेरणादायी आहे याचे त्यांनी मार्मिक विश्लेषण केले.
मान्यवरांची उपस्थिती
या अभिवादन सोह ळ्याला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या ध्येयधोरणां नुसार शैक्षणिक आणि सामाजिक वारसा जप ण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रशांत पाटील सूत्र संचालन प्रा मनोज पवार आणि आभार प्रदर्शन प्रा मनीषा बोरसे यांनी केले
Comments
Post a Comment