पत्रकारांसाठी औद्योगिक कंपनी स्थापन; पाचोऱ्यात ऐतिहासिक निर्णय, एकमताने मंजुरी

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी पाचोरा येथे पार पडलेल्या बैठकीत औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक व दूरदृष्टीपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. व्यापारी भवन येथे झालेल्या या बैठकीस सुमारे ३० ते ३५ पत्रकारांची उपस्थिती होती.
बैठकीच्या प्रारंभी पत्रकारांच्या दैनंदिन अडचणी, आर्थिक अस्थैर्य आणि उद्योग-व्यवसायातील संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. तालुका माझा न्यूजचे संपादक तथा जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांनी प्रस्तावना मांडताना पत्रकारांनी केवळ वृत्तांकनापुरते मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली.
याच पार्श्वभूमीवर पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी औद्योगिक क्षेत्रात कंपनी स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास उपस्थित सर्व पत्रकारांनी एकमताने मंजुरी देत सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्णयामुळे पत्रकारांसाठी रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच, जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लवकरच एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सी.एन. दादा चौधरी, सचिन दादा सोमवंशी, डॉ. योगेश पाटील, सुनील दादा पाटील यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन केले. “एकजुटीनेच पत्रकारांच्या समस्या सोडविता येतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस सी.एन. दादा चौधरी, सचिन दादा सूर्यवंशी, दिलीप दादा जैन, सुनील दादा पाटील, डॉ. योगेश दादा पाटील, अनिल आबा येवले, राजू दादा धनराळे, किशोर दादा रायसागडा, नरसिंग दादा भुरे, बंडूभाऊ सोनार, संदीप भाऊ परदेशी, दिलीप भाऊ पाटील, प्रवीण भाऊ मिस्तरी, ईसा मुसा तडवी, कुंदन भाऊ बेलदार, गौतम भाऊ सोनवणे, राजेंद्र भाऊ खैरनार, सुनील भाऊ कोळी, प्रवीण भाऊ बोरसे, गजानन भाऊ गिरी, राकेश दादा सुतार,  स्वप्निल भाऊ कुमावत , सुनिल भाऊ पाटील, राहुल भाऊ महाजन, बालचंद्र भाऊ राजपूत, चिंतामण आबा पाटील, भिकन भाऊ पाटील, नंदकुमार दादा शेलकर, गजानन भाऊ लाधे, फकीरचंद दादा पाटील, भुनेश भाऊ दुसाने आदी पत्रकार उपस्थित होते.
बैठकीतून पत्रकारांच्या एकजुटीचा ठोस संदेश देत भविष्यातील वाटचालीसाठी दिशा निश्चित करण्यात आल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद