“क्रांतीसूर्य फुले जयंतीनिमित्त पाचोरात विचारांचा जागर — एकतेतून परिवर्तनाचा निर्धार!”


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
पाचोरा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, युवक मंडळे तसेच सर्व राजकीय पक्षांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या जयंतीनिमित्त सकाळी 9 वाजता कृष्णापुरी येथून महात्मा फुले स्मारकापर्यंत पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध देखावे, ढोल-ताशा पथक आणि क्लासिक बँडच्या गजरात शहर दुमदुमणार आहे.
दि. 12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता सप्तशृंगी देवी मंदिर, कृष्णापुरी येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध सुधारणावादी विचारवंत मा. पैगंबर शेख हे “शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे वैचारिक नाते” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या मुलींसाठीच्या पहिल्या शाळेचा देखावा तसेच महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधल्याचा ऐतिहासिक प्रसंग साकारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जन्मोत्सव समिती, पाचोरा तसेच जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद