“सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश; सोयगावात अंत्ययात्रा आंदोलन, महावितरणला इशारा”

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
सोयगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सोयगाव येथे शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने अंत्ययात्रा काढत जोरदार निदर्शने केली. यावेळी महावितरण कंपनीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सोयगाव महावितरण कार्यालयात जाऊन अभियंता तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यामध्ये येत्या दोन दिवसांत महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
तसेच, तालुक्यातील कोणत्याही गावात वीजपुरवठा बंद असल्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणच्या संबंधित अभियंत्यांवर राहील, असा ठाम इशाराही देण्यात आला. बनोटी येथील अभियंता फोन उचलत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीची लेखी तक्रारही सोयगाव महावितरणकडे करण्यात आली.
दरम्यान, सोयगाव येथील महावितरण अभियंत्यांनी शेतकऱ्यांना सिंगल फेज विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात भगवान बारी, प्रितम बडगुजर, माळेगाव पिंप्रीचे सरपंच दादा जाधव, संतोष जाधव, अजमल राठोड, रमेश सावळे, संदीप इंगळे, यशवंत कोतकर, विरेंद्रसिंग देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, शुभम रोकडे, अनिल फरकांडे, योगेश चव्हाण आदी शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार शेतकरी दिनेश गायकवाड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद