अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी पाचोरा पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल;मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी):-शहरात मध्यरात्री  एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली असून आरोपीविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्यरात्रीच्या घटनेने पाचोरा शहरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरात दि.१९ रोजी मध्यरात्री ००:३० वाजेच्या सुमारास  अल्पवयीन मुलगी ही तिच्या आजीसोबत घरात झोपलेली असतांना २५ ते ३० वयोगटातील अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत असताना मुलीस जाग आल्याने आरडाओरड केली असता सदरील इसमाने तेथून पळ काढला  नागरिकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नदीकाठावरून उडी मारून खाली पडल्याने त्याचे डोके फुटले असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने कोणीतरी ११२ वर फोन डायल करून पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन इसमास ताब्यात घेतले असून त्यावर जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती  देण्यात आली आहे. सदर घटने प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून  आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.

*घटनास्थळी भेट-                  पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार ,पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी,श्रीकांत गायकवाड यांनी भेट दिली असून उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद