लिनेस क्लब पाचोरा च्या माध्यमातून माणुसकीचा हात; विविध उपक्रमांनी केले दानकार्य


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
लिनेस क्लब ही एक सामाजिक सेवा संस्था आहे. "लिनेस" म्हणजे सौम्यता, सेवा आणि समाज कार्य करण्यासाठी भावना दर्शवते, आणि याच समाज उपयोगी कार्यामध्ये आपला देखील हातभार लागावा या उद्देशाने पाचोरा मध्ये लिनेस क्लब ची  स्थापना दि.14/4/2026 रोजी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करून , त्यांच्या कामा विषयी जनजागृती या माध्यमातून करण्यात आले. या वेळी सु भा पाटील विद्यामंदिर येथील विद्यार्थी विधान कोमल वाघ याने बाबा साहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारून त्यांच्या विषयी भाषण केले व अध्यक्षा प्रा सौ जयश्री वर्मा  वाघ यांनी  मानवतेची शपत घेण्याचा उपक्रम राबविला.

तसेच आज दिनांक 18 एप्रिल 2026,  शनिवार,  रोजी लिनेस क्लब द्वारे माठ व फळांचे वाटप, अन्नदान,  प्लास्टिक मुक्त अभियान अंतर्गत कापड़ी पिशवी वितरण , पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौदा हे उपक्रम यशस्वी रित्या केले गेले.
या प्रसंगी लिनेस क्लब अध्यक्षा प्रा सौ जयश्रीताई कोमल वाघ, सचिव सौ राजश्री संदेश जैन , खजिनदार सौ कविता प्रदिप महाजन, पि आर ओ कु चेतना हिरे, सौ संगिता सिसोदिया, सौ. छाया शशिकांत धुळेकर, सौ मोनिका थेपडे, सौ सौदामिनी निखिल पाटील, सौ रुपाली पाटील, सौ प्रिया लाहोटी, सौ अंजली गवांदे उपस्थित होते.
माठ व फळांचे वितरण सौ संगीता सिसोदिया जी , अन्नदान सौ छाया शशिकांत धुळेकर जी , कापडी पिशवी वितरण सौ. मोनिका अग्रवाल थेपडे जी , पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या हौदा सौ. राजश्री संदेश जैन जी  यांच्या कडून करण्यात आले.
तसेच लिनेस क्लब अध्यक्षा प्रा सौ जयश्रीताई कोमल वाघ व खजिनदार सौ कविता प्रदिप महाजन यांनी सर्वांना असेच सह कार्याचे व सोबत येण्याचे आव्हान केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद