गेल्या रमजान महिन्यातही मागणीवरून अवैध धंद्यांना आळा; अर्जावर कारवाईचा धडाका कायम — प्रभावी मोहिमेमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचा ग्रामस्थांकडून सत्कार


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक — सत्यशोध न्यूज चॅनल
भोकरी, वरखेडीत अवैध धंद्यांवर लगाम घातल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे रमजान महिन्यात गावकऱ्यांच्या मागणीची पोलिसांनी घेतली दखल घेऊन भोकरी, वरखेडीत अवैध धंदे पूर्णतः बंद केले आहेत.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोकरी हे गाव प्रामुख्याने मुस्लिम समाजातील बांधवांचे असून जवळच असलेल्या वरखेडी गावातही हिंदू, मुस्लिम बांधव एकत्रितपणे राहत आहेत. मागील महिन्यात मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना आणि रमजान ईद सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या काळात मुस्लिम समाजातील बांधव कडकडीत उपवास (रोजा) पाळून अल्लाहची प्रार्थना करतात.
या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात परिसरात कोणतेही अवैध धंदे सुरू राहू नयेत, यासाठी भोकरी व वरखेडी गावातील मुस्लिम तसेच हिंदू बांधवांनी एकत्र येत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्याकडे मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी मागील दीड ते दोन महिन्यांपासून परिसरात विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेमुळे भोकरी आणि वरखेडी गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून आजही परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करत भोकरी व वरखेडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पोलिसांनी घेतलेल्या ठोस कारवाईबद्दल सर्व पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले.
यावेळी भोकरी व वरखेडी येथील ग्रामस्थ चिराग शहा, रशिद शहा, लुकमा ईमाम काकर, जब्बार उस्मान काकर, अ. रहमान अन्तुले, गजानन पाटील, अबजल कुरेशी यांच्यासह वरखेडी येथील बु. खु. येथील पोलीस पाटील बाळु शंकर कुमावत व दगडू गोसावी आदी उपस्थित होते.
दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतर गावांमध्येही अवैध धंद्यांविरोधात सतत धाडसत्र सुरू असून पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद