पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवघ्या तीन तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; मुद्देमालासह आरोपी जेरबंद


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालत पाचोरा पोलिसांनी केवळ तीन तासांत दोन गंभीर चोरीचे गुन्हे उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत एकूण 94,500 रुपयांचे ए.सी. तसेच सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी नय्युम जहांगिर देशमुख (व्यवसाय – इलेक्ट्रिक दुकान, रा. आक्सानगर, जारगाव ता. पाचोरा) यांच्या गोडाऊनमधून गोदरेज कंपनीचे तीन ए.सी. (किंमत 94,500 रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. ही चोरी 1 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान घडली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 177/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने वेगाने तपास सुरू करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रिहान हमीश शहा (वय 22, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व तीन ए.सी. जप्त करण्यात आले.
या कारवाईत गुन्हे शोध पथकातील खालील पोलीस कर्मचारी सहभागी होते:
सफौ/45 विलास पाटील,
पोहेकॉ/1058 वसीम शेख,
पोहेकॉ/श्रीकांत गायकवाड,
पोकॉ/1230 योगेश पाटील,
पोकॉ/990 संदीप राजपूत,
पोकॉ/3263 गणेश कुंवर (नेमणूक – पाचोरा पोलीस स्टेशन)
याचप्रमाणे, पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 174/2026 (दि. 15/04/2026) मध्ये नोंद असलेल्या 30,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचाही उलगडा करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अवघ्या तीन तासांत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या धडाकेबाज कारवाईमुळे संबंधित फिर्यादी तसेच परिसरातील नागरिकांनी पाचोरा पोलिसांचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून, भविष्यात अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद