१५ एप्रिल २०२६बुधवार रोजी “लेडी सिंघम” सपोनि कल्याणी वर्मा यांचा धडाकेबाज एक्शन; जुगार अड्डे उद्ध्वस्त, अवैध दारू विक्रेत्यावरही कारवाई!


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) : पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर पुन्हा एकदा कडक कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) कल्याणी वर्मा यांनी “वॉश आऊट” मोहिमेचा प्रभाव दाखवून दिला आहे. दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरखेडी व लोहारा बिट परिसरात मोठी छापेमारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार काही इसम “झन्ना मन्ना” नावाचा मांग पत्त्यांचा जुगार पैसे लावून खेळत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष पथक तयार करून आंबेवडगाव येथील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील सार्वजनिक जागा, आंबेवडगाव तांडा नं. १ परिसर, डांभुर्णी रोड तसेच कोकडी शिवारातील पी.सी. जिनिंगच्या मागील भागात एकाच वेळी धाड टाकण्यात आली.
या कारवाईत
सचिन पवार, विश्वनाथ राठोड, श्रीराम राठोड, भुषण जगताप, प्रमोद भुसारे, संदीप पाटील, अतुल जगताप (सर्व रा. आंबेवडगाव), प्रविण पाटील (रा. कु-हाड) व सुनिल चव्हाण (रा. कोकडी तांडा)
अशा एकूण ९ आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीसांनी आरोपींच्या ताब्यातून तब्बल २,०६,३२० रुपयांची रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये ३ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, याच दिवशी कु-हाड गावातही आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. दिपक विष्णु तेली हा “हॉटेल तारंगण” येथे बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून ६,४८० रुपयांच्या ६६ दारूच्या बाटल्या जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विठ्ठल पवार, पोहेकॉ तात्याबा नागरे, भारत पाटील, योगेश भिलखेडे, प्रमोद वाडीले, आकाश कोकाटे आदींचा सक्रिय सहभाग होता.
अवैध धंद्यांना थारा नाही – असा स्पष्ट संदेश देत कल्याणी वर्मा यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद