महिला सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांचा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील महिलांनी केला सत्कार!”
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पिंपळगाव हरेश्वर : पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत प्रभावी बंदी आणणाऱ्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांचा आज पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील महिलांकडून उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
सरपंच सौ. सविता चंद्रकांत सोनवणे, पूजा दिलीप पाटील, वनिता कडूबा शिंदे, रूपाली हितेश पाटील, रेखा कौलास पाटील, रूपाली सागर धनराळे, सपना गणेश पाटील, ममता राहुल पाटील या महिलांनी पुढाकार घेत वर्मा मॅडम यांच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांना गौरविले.
रमजान महिन्याच्या पवित्र काळात मुस्लिम बांधव व सरपंच यांच्या मागणीनुसार भोकरी व भरपूर परिसरासह पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दारू, सट्टा, पत्ता-जुगार यांसारख्या अवैध धंद्यांवर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कठोर कारवाई करून प्रभावी बंदी घालण्यात आली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील व्यसनाधीनतेवर मोठा आळा बसला असून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पुरुषांची कमाई व्यसनात जात होती, त्यामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ येत होती. मात्र, “लेडी सिंघम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याणी वर्मा मॅडम यांनी कडक भूमिका घेत परिसरात वचक निर्माण केला आहे.
महिलांनी व्यक्त केलेल्या भावना सांगताना, “या कारवाईमुळे आमच्या संसाराला आधार मिळाला असून मुलांच्या भविष्याला नवे बळ मिळाले आहे,” असे नमूद करण्यात आले.
स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत करत अवैध धंद्यांविरोधातील कारवाई पुढेही अशीच सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment