गर्दीचा फायदा घेणारी चोरटी महिला जेरबंद! पाचोरा बसस्टॅण्डवर पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
दि. १५/०४/२०२६
पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पाचोरा पोलिसांनी प्रभावी कारवाई करत गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या एका महिलेला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयश्री स्वप्नील पाटील (वय २२, रा. विवेकानंद कॉलनी, भडगाव) या आसनखेडा येथून पाचोरा येथे एम.एम. कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी आल्या होत्या. पेपर संपल्यानंतर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्या पाचोरा बसस्थानकावरून आसनखेडा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढल्या असता, गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली.
या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू करून गोपनीय माहितीच्या आधारे संगिता करण सोळुंखी (वय ४२) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेला मुद्देमाल – एक सोन्याचा मणी व दोन डोरले – पोलिसांच्या ताब्यात दिला.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोउपनि कृष्णा घायाळ, विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, गणेश कुवंर आणि महिला पोलीस अंमलदार प्रिया आहेर यांचा सहभाग होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीकांत गायकवाड हे करीत आहेत.
👉 पाचोरा पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद