अवैध धंद्यांवर करारी घाव घालणाऱ्या “लेडी सिंघम” कल्याणी वर्मा यांचा राहिलेला नारी सन्मान पत्रकार संघाकडून बहाल
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चैनल
पिंपळगाव हरेश्वर : पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघाच्या वतीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कल्याणी वर्मा यांचा आज “नारी सन्मान” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला।
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. किशोर लोहार आणि सहसचिव तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. रविशंकरजी पांडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांपासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या दारू, सट्टा व इतर अवैध धंद्यांवर सौ. कल्याणी वर्मा यांनी कठोर कारवाई करत प्रभावीपणे आळा घातला आहे. त्यांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक मजबूत झाली आहे.
या कारवाईमुळे हरेश्वर पिंपळगाव परिसरातील महिला वर्गात विशेषतः आनंदाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एका महिला अधिकाऱ्यांनी महिलांच्या भावना आणि समस्या ओळखून ठोस कारवाई केल्यामुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण अधिक दृढ झाले आहे.
महिला दिनानिमित्त देण्यात येणारा हा सन्मान काही कारणास्तव राहून गेला होता. त्यामुळे १४ एप्रिल या पवित्र दिवशी त्यांना “नारी सन्मान” पुरस्कार देण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या कार्याचे कौतुक करत मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
पिंपळगाव हरेश्वर परिसरात अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या त्यांच्या धाडसी आणि सातत्यपूर्ण कारवाईबद्दल नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Comments
Post a Comment