महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय” : पाचोऱ्यात ‘इच्छा स्फूर्ती इमिटेशन ज्वेलरी अँड साडी लेडीज कॉर्नर’चे दिमाखात उद्घाटन
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा :
येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. लक्ष्मी ताई पाटील यांच्या पुढाकारातून पुनगाव रोडवरील श्री. अमोल शिंदे यांच्या शाळेजवळ ‘इच्छा स्फूर्ती इमिटेशन ज्वेलरी अँड साडी लेडीज कॉर्नर’चे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या नव्या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. विजय बसंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास पाचोरा येथील महिला नगराध्यक्ष सौ. सुनीता किशोर पाटील, भाजप नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी, सौ. सुचिता ताई दिलीप वाघ, सौ. ज्योतीताई संजय वाघ, सौ. पूजा ताई अमोल शिंदे, सौ. सुप्रिया सचिन सोमवंशी तसेच सौ.अनिता पाटील,सौ कुंदन पंड्या यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी महिलांनी उद्योग, राजकारण आणि समाजकारणात सक्रिय सहभाग घेत स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले.
सौ. सुचिता दिलीप वाघ यांनी महिलांनी सक्षम होऊन प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, “नारी ही दोन घरांचा उद्धार करणारी शक्ती आहे,” असे प्रतिपादन केले.
सौ. ज्योतीताई संजय वाघ यांनी इमिटेशन ज्वेलरीच्या सुरक्षिततेवर प्रकाश टाकत, “मौल्यवान सोन्यापेक्षा बेंटेक्स दागिने सुरक्षित असून महिलांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे,” असे सांगितले.
सौ. पूजा ताई अमोल शिंदे यांनी महिलांनी नेतृत्वगुण विकसित करून भविष्यात समाजकारणात मोठी भूमिका निभावावी, असे मत व्यक्त केले.
सौ. सुप्रिया सचिन सोमवंशी यांनी महिलांनी घर-परिवार सांभाळत समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेत न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘इच्छा स्फूर्ती इमिटेशन ज्वेलर्स अँड साडी’च्या संचालिका सौ. लक्ष्मी पाटील व सौ. ज्योती पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व महिला वर्गाचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
या उद्घाटन सोहळ्यामुळे पाचोरा शहरात महिला उद्योजकतेला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
Comments
Post a Comment