"सलीम भाई शेख आणि बंडू चौधरी यांची धाव… तुटलेल्या चेंबरमध्ये अडकलेल्या वासराला दिला जीवदान!”

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : शहरातील नगरपालिका परिसरातील जीन भागात असलेल्या चेंबरची लोखंडी जाळी तुटल्यामुळे एका निरपराध गाईच्या वासराचे जीवित धोक्यात आले. निष्काळजीपणामुळे उघड्या अवस्थेत असलेल्या या चेंबरमध्ये वासरू अचानक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिका नगरसेवक श्री. सलीम भाई शेख व माजी नगरसेवक श्री. बंडू चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी विलंब न लावता मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची गंभीरता लक्षात आणून दिली.
मुख्याधिकारी श्री. देवरे यांनीही संवेदनशीलता दाखवत तात्काळ नगरपालिका कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाजी मंडईतील दुकानदारांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांती त्या वासराला सुरक्षितरित्या खड्ड्यातून बाहेर काढले. या वेळी उपस्थित नागरिकांनीही मदतीचा हात पुढे करत एक प्रकारे मानवतेचे दर्शन घडवले.
ही घटना केवळ एका प्राण्याच्या बचावापुरती मर्यादित नसून, शहरातील सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इशारा ठरली आहे. उघडी व तुटलेली चेंबर जाळी ही नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकते, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शहरातील सर्व चेंबरची पाहणी करून तुटलेल्या जाळ्या तात्काळ बदलण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच प्रत्येक चेंबरवर नवीन मजबूत जाळी बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या संपूर्ण घटनेत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी दाखवलेली तत्परता ही खऱ्या अर्थाने समाजातील संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद