नामकरण सोहळ्यात भक्तीमय रंगत; ‘निर्वेद’ नावाने बाळाचे स्वागत
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : येथील रेणुका नगर परिसरात सामाजिक कार्यकर्ते श्री. के. एस. महाजन व आशा महाजन यांचा नातू तसेच श्री. परशुराम पाटील व ॲड. भाग्यश्री पाटील यांच्या सुपुत्राच्या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
या सोहळ्याची खास रंगत जळगाव येथून आलेल्या भजनी महिला मंडळांनी वाढवली. त्यांनी सादर केलेली बाळगोपाळांची भजने, विविध गीते आणि पारंपरिक उखाण्यांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि आनंदमय केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित सर्वांचे मन प्रसन्न झाले.
कार्यक्रमाला परिसरातील महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाळ तसेच नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामकरणाच्या वेळी बाळाची आत्या, काकू, आजी-आजोबा व इतर कुटुंबीयही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
या मंगल प्रसंगी बाळाचे नाव ‘निर्वेद’ असे ठेवण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचा पाटील व महाजन परिवारातर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment