मूकबधिर निवासी विद्यालयात रोटरी क्लब कडून आरोग्य व थेलेसेमिया तपासणी


राजेंद्र खेरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज
पाचोरा प्रतिनिधी:- रोटरी क्लब पाचोरा यांचेकडून मुकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे विद्यार्थ्यांची आरोग्य व थेलेसेमिया तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली,सचिव डॉ अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य भरत सिनकर,डॉ सिद्धांत तेली,डॉ कुणाल पाटील,डॉ वैभव सूर्यवंशी,ज्ञानेश्वर पाचोळे सर,डॉ प्रशांत सांगडे,संजय कोतकर,नितीन जमदाडे, नितीन तायडे उपस्थित होते.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांचेसोबत शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी डॉ सिद्धांत तेली यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगा प्राणायाम व आहारचे महत्व समजवून सांगितले तर डॉ कुणाल पाटील यांनी आरोग्याची निगा व मैदानी खेळाचे महत्व यावर माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद