जय हिंद मित्र मंडळाचा हनुमान जयंतीनिमित्त भव्य अन्नदान व दिपक गलंगी बॅंड,इतर आकर्षणासह मिरवणुकीचा उत्सव

राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक)सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : शहरातील कृष्णापुरी भागात जय हिंद मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित अन्नदान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहतात.
पाचोरा भडगावचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील तसेच नगरसेवक प्रविणभाऊ ब्राम्हणे यांनी ही सकाळी हनुमान मंदिरात येऊन दर्शन घेतले.व उपस्थिती दर्शवली.
या उपक्रमाअंतर्गत जय हिंद मित्र मंडळाच्या वतीने हजारो भाविकांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. कार्यक्रमादरम्यान श्री हनुमानाची विधीवत पूजा व आरती अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडते.
यावेळी कृष्णापुरीतील जय हिंद मित्र मंडळ तसेच जय हिंद लेझीम मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित भाविकांचे उत्साहात स्वागत करण्यात येते. संध्याकाळी श्री हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येते, ज्यामध्ये लेझीम पथक, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून जातो.
👉 आज सायंकाळी 5 वाजता, कृष्णापुरी येथील श्री हनुमान मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🚩 कृष्णापुरी, पाचोरा शहर तसेच पाचोरा तालुक्यातील सर्व नागरिकांना आग्रहाचे आमंत्रण! 🚩
प्रमुख आकर्षण :⤵️

💥दीपक बँड (गलंगी)

💥अल्ताफ भाई ढोल ताशे पथक
 
💥पेपर शॉर्ट व भव्य फटाक्यांची आतिषबाजी 🚩🙏🏻
हा सोहळा भक्ती, एकात्मता आणि सामाजिक सेवा यांचा सुंदर संगम ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद