“पंचायत समिती पाचोरात शिक्षक समायोजनाची पारदर्शक मोहीम; दहा जि.प. शिक्षकांची नियोजनबद्ध बदली”

राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक)– सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – पंचायत समिती पाचोरा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस आणि पारदर्शक पाऊल उचलत दहा शिक्षकांचे समायोजन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. शिक्षण व्यवस्थेतील समतोल राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरत असून, यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
पंचायत समिती पाचोरा हद्दीत सुमारे दीडशे जिल्हा परिषद शाळा कार्यरत असून, संचमान्यतेनुसार एक मुख्याध्यापक, एक पदवीधर व आठ उपशिक्षक अशी पदे अतिरिक्त ठरत होती. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२६ रोजी समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली.
गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे व गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागांवर बदली देण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रक्रियेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड, कार्यालय अधीक्षक अमोल पाटील तसेच लिपिक सतीश पाटील, संजय पाटील, सुनील शिवदे, घनशाम चौधरी आणि सर्व केंद्र प्रमुखांनी सक्रिय सहकार्य केले.
दरम्यान, शिक्षक संघटना प्रतिनिधींनी समायोजन प्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्याबद्दल पंचायत समिती अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी शिक्षकांना पटसंख्या वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे तसेच जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
शिक्षण क्षेत्रातील असमतोल दूर करून गुणवत्ता वाढविण्याकडे उचललेले हे पाऊल पाचोरा तालुक्यासाठी सकारात्मक दिशा दर्शवणारे ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद